हा ब्लॉग शोधा

बुधवार, २४ मे, २०१७

फरार


जगणे पुरे करावे अंधार फार झाला
ह्या क्रूर औषधांनी यमही फरार झाला

भरपूर लोकसंख्या होती खरी समस्या
मारा जमात छोटी सोपा विचार झाला

गुंडास पोट होते होते जसे बळीला
इकडे प्रहार केला तिकडे पगार झाला

भोळा कधीच नव्हता होता सतर्क राजा
मतदार मूर्ख दिसता राजा हुशार झाला

प्राचीन ज्ञान सारे जपले कितीक वर्षे
उपयोग फक्त त्याचा फारच सुमार झाला

वैविध्य जे मिळाले ती एकताच म्हटले
अवघ्या विसंगतीचा नंतर जुगार झाला

- निलेश पंडित
२४ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा