हा ब्लॉग शोधा

शनिवार, २७ मे, २०१७

गुणी


गुणी तो रोज लिहितो वाचतो संवेदना काही
कृतीमध्ये तरी त्यांचा कधी लवलेशही नाही

जिथे जातो तिथे न्याहाळतो तो सूक्ष्म ते सारे
तरी सुटतात नजरेतून सुंदरशा दिशा दाही

व्यथा तो कळकळीने व्यक्त करतो भ्रष्ट मूल्यांची
भले तो टाळुनी कर साचवी काळाच पैसाही

कधी अर्थार्जनाच्या पद्धती होत्या हव्या साऱ्या
निपजल्या खूप नकळत त्यांत खर्चाच्याच वाटाही

लपवतो खूप नोटा फाइली अन् पुस्तकांमध्ये
अशी जाज्वल्य भक्ती वापरे गीता नि गाथाही

हुशारी हीच त्याची साठवे तो खूप नेमाने
भुकेपुरतेच कोणीही मिळवते वाघ कुत्राही

-  निलेश पंडित
२७ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा