हा ब्लॉग शोधा

शनिवार, २७ मे, २०१७

नकाशा


जसे आयुष्य माझे मीच समजू लागतो आहे
मनस्वी, एकटा, विक्षिप्त, वेडा वाटतो आहे

मला काहीच नाही खंत असल्याची नि नसल्याची
अशी प्रतिमा मनापासून मी सांभाळतो आहे

कुठे ना जायचे ना यायचे असली भ्रमंती ही
नकाशा त्यातही कसलातरी मी आखतो आहे

हजारो लोक सल्ला नेमका आहेत देणारे
कधीचा मी इथे आधार थोडा मागतो आहे

जरा चुकलीच माझी कोष्टके जगण्यातली सारी
जिथे स्वप्नात रमते जग तिथे मी जागतो आहे

कुठे जाताच माझा तोल थोडा मीच सावरतो
पुन्हा थोडी पितो अन् वर बघ्यांना पाजतो आहे

- निलेश पंडित
२८ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा