हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ जून, २०१७

औदात्त्य


(वृत्त: हरिभगिनी)

स्वच्छ निळ्या डोळ्यांत तिच्या स्फटिकांसम होते शुभ्र झरे
मायेचे अनुकंपेचे जग सुखद सहज उमले बहरे
मोह नसे पण नसे विरक्ती ना कर्तव्याचा भाव
अहंतेविना आपुलकी अंतरात आपोआप स्फुरे

भाषा कधी न ओशटशा चतुराईने लडबडलेली
समोर दिसता समय कृतीचा कधी न ती अवघडलेली
ना श्रेयाचे आकर्षण ना वलयांची काळजी तिला
आयुष्याची सर्व रहस्ये जणू स्पष्ट उलगडलेली

नितळ निकोप नि सुलभ सरळसे प्रेम तिचे निर्भेळ असे
शृंगारा-वात्सल्याविण स्पर्शात नेहमी ऊब वसे
निर्हेतुक ती अशीच जगली अंती अशीच विरलीही
प्रश्न पाडला मात्र जगाला जगणे असले जमे कसे

रक्ताचे नाते नसणे ना संभवणे असता पाया
निर्विकार निर्मोही मन ... सेवेस सिद्ध होती काया


- निलेश पंडित
२३ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा