हा ब्लॉग शोधा

शनिवार, ८ जुलै, २०१७

नौका


त्या नौकेवरती अनेक होते यात्री
अस्वस्थ त्रस्त कित्येक दिवस अन् रात्री
... गतिहीन चालता सफर यातनामय ती
तिळमात्र न उरता मुक्कामाची खात्री

अल्पकाळ एका टोकापाशी जमती
कंटाळताच दुसऱ्या टोकाला पळती
... मग हिंदकळे अन् अस्थिर होई नौका
भर त्यात टाकिती लाटा वारे भरती

तो अंती होता केवळ स्वस्थ बसून
दुर्लक्षित केवळ ठरणे स्वीकारून
... ओठांवर होते परिपूर्तीचे हास्य
जाणीव एक उरणारच हे जाणून

असली नौका बुडताना तोही बुडतो
पण शतशतकांसाठी साॅक्रेटिस घडतो


- निलेश पंडित
९ जुलै २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा