हा ब्लॉग शोधा

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

उत्तरे


ग्रासता भीती इथे ह्रदयात कोणी शांत नाही
मोडलेल्या माणसांचा पण कुठे आकांत नाही

फक्त उरलेल्या उपाशी माणसांचा प्रश्न आहे
माणसे ही संपली की जेवणाची भ्रांत नाही

जाड पडदा ठेवतो दुनिया नि मी दोघांमधे मी
कोणताही चेहरा बघण्यात माझ्या क्लांत नाही

मानवी कृत्ये नि ज्ञानातून शून्यच जन्म घेते
फार कोणीही तसा अवक्रांत वा उत्क्रांत नाही

मोह भय धाकात आता ठेवती न्यायालयाला
सत्र करतो मारण्याचे त्यासही देहांत नाही

प्रश्न माझा मी मनातच नष्ट करतो अन् विसरतो
जो खरोखर उत्तरे देतो असा दृष्टांत नाही

- निलेश पंडित
६ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा