हा ब्लॉग शोधा

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

सापळे

घोषणांचा मूढ गलका अन् सभांची वादळे
लोपले शिवबा नि मागे फक्त उरले मावळे

धावती वेगात आता कोवळ्या पुढल्या पिढ्या
हंस जेथे विहरले तेथेच दिसती कावळे

खोडला इतिहास त्यांनी बदलले विज्ञानही
शिक्षणाचे मार्ग झाले शोषणाचे सापळे

भरजरी आनंद दिसतो आत वसते वेदना
काळ गेला सौख्यही दु:खात जेव्हा आढळे

आपला आलेख चढता दडवतो जो तो इथे
फार पूर्वी क्षण यशाचा पूर्ण गावाला कळे

- निलेश पंडित
१४ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा