हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

नजर


किर्र घनदाट
काळोख
अगदी पहिल्या पावलापासूनच
नजर सुरू होते तिथपासून
पोहोचू शकेल तिथपर्यंत
वर काटेकुटे पायाखाली
शिसारी शहारे आणणारे
थंडगार मऊ
हलते सरकते स्पर्श
दलदलीची ओल
मधेच काही दंश
पोटरी मांड्यांपर्यंत

हातानं आधार घ्यावा
खांदा टेकवावा
अशा भिंती
शेवाळलेल्या निसरड्या

चाचपडणं अंगवळणी
मनाला साथ ह्रदयाची
ह्रदयाला मनाची
शरीर त्यांच्यावर
सोपवलेलं

फार उशीरा समजलं
की अशा स्थितीत
वाढतात फक्त संकटं
भयभीत होऊन ... राहून
डोळे गच्च मिटून घेण्यानं


- निलेश पंडित
७ सप्टेंबर २०१७

२ टिप्पण्या: