हा ब्लॉग शोधा

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

उच्छाद

देश वसला नेमका कोणामुळे हा वाद झाला
पेटल्याने वाद असले देश हा बरबाद झाला

माणसांना वसवण्यासाठी वसवला देश आम्ही
रोज मृत्यू सैनिकांचा मात्र जिंदाबाद झाला

देशभक्तीच्या अपेक्षा राष्ट्रगीतावर घसरल्या
खूपसा उन्माद केवळ थोडका संवाद झाला

नाव भूगोलातल्या एका प्रदेशाचे दिलेले
धर्म त्यातच गवसल्याने केवढा उच्छाद झाला

रेशमी आवाज त्यांचे गायकी अस्सल सुरीली
मात्र झाला एक 'पंडित' अन् दुजा उस्ताद झाला

- निलेश पंडित
४ नोव्हेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा