हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

युद्ध

(The Next War (By Wilfred Owen, 1917) ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)


खेळीमेळीतच आम्ही मृत्यूपर्यंत चाललो
त्याच्यासोबत बसलो शिळंपाकंही जेवलो
दुर्लक्षिले आम्ही त्याचे बरबटलेले हात
हुंगला विषारी धूर खोल भरून श्वासात

जरी ढाळली आसवे गमावली न हिंमत
त्याने सदोदित केले शस्त्राअस्त्रांनी उध्वस्त
आम्ही गायलो सुरात सूर मिसळून त्याचे
झेलताना घाव त्याच्या धारदार कोयत्याचे

शत्रू नव्हताच मृत्यू जुना सखाच आमचा
बंध हसत खेळत सोबतीत जगण्याचा
गरजेचेच हे सख्य स्वामीनिष्ठ सैनिकास
पुन्हा पुन्हा युद्धे योद्धे दिसतील ह्या जगास

... भले मारतो बढाई कृत्रिमशा गर्वापोटी
व्यर्थ आहुती आमची कुठल्याशा झेंड्यासाठी


- निलेश पंडित
२५ नोव्हेंबर २०१७

____________________________

मूळ कविता:

Out there, we've walked quite friendly up to Death,-
Sat down and eaten with him, cool and bland,-
Pardoned his spilling mess-tins in our hand.
We've sniffed the green thick odour of his breath,-
Our eyes wept, but our courage didn't writhe.
He's spat at us with bullets and he's coughed
Shrapnel. We chorussed when he sang aloft,
We whistled while he shaved us with his scythe.

Oh, Death was never enemy of ours!
We laughed at him, we leagued with him, old chum.
No soldier's paid to kick against His powers.
We laughed, -knowing that better men would come,
And greater wars: when each proud fighter brags
He wars on Death, for lives; not men, for flags.

Wilfred Owen
1917




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा