हा ब्लॉग शोधा

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

जाण

बदल सतत । एक झंझावात
बाहेर नि आत । अस्थिरता

अस्थिरतेतही । मात्र एक धागा
गुंफे साऱ्या जगा । अंतर्बाह्य

बोलतो कपडा । वेगळे बाहेर
नग्न खोलवर । आत सारे

माणसांचे स्तर । झाले अगणित
माणसाची मात । स्वत:वर

खरे आणि खोटे । निव्वळ सापेक्ष
भक्षक नि भक्ष । स्थिर सत्य

ग्रह पूर्वग्रह । सत्यासत्यतेचा
फक्त भावनेचा । कारभार

जगता जगता । दृढ होई जाण
आपले आपण । गुरू व्हावे

- निलेश पंडित
१७ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा