हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

व्याप्ती

गतजीवनातले पदर जसे उलगडले
तसतसे मला माझेच चेहरे दिसले
... उद्विग्न कधी आनंदित वा दिग्मूढ
सूक्ष्मातिसूक्ष्म फरकाने असंख्य घडले

यश अपयशात वा बदलाविण थिजताना
अश्रुंच्या पुरात शोकाकुल भिजताना
... उमललो बिघडलो अगतिक तडफडलोही
माझ्याशी मी झगडलो खोल रुजताना

मी जसा धावलो जीवनमार्गावरती
मापली जाणली आयुष्याची व्याप्ती
... बिनचुक ओळखले माझे परके कोण
ठेवले नेहमी विश्वासू सांगाती

कळले शेवट अज्ञात तरीही ठरतो
त्या टप्प्यावर माणूस एकटा उरतो


- निलेश पंडित
२६ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा