हा ब्लॉग शोधा

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

धर्म

माणसास पडले अवघड प्रश्न अनेक
त्यातून निपजला टिकला सुप्त विवेक
.... समुहात जगावे जिंकावे समुहांना
सभ्यतेत वसला पशुतेचा उद्रेक

आंदोलित जगण्यामधे निपजला हाही
जगण्यात पाहिजे होती रचना काही
.... निर्भयतेने जगविण्यास विकसित झाला
पसरविली भीती दिशांमधे मग दाही

फसवी रूपे फसव्या व्याख्या अवतरल्या
गुण स्वभाव जाती .... संज्ञा कैक चिकटल्या
.... दुष्टांचे ठरला निव्वळ अभेद्य शस्त्र
जन्मून वाल्मिकी नंतर झाला वाल्या

मोघम अवघड ढोबळ अन् अगम्य असणे
मूर्ती झेंडे चिन्हे रंगांनी सजणे
.... गाभ्यात अफूची मात्र असे हा गोळी
नेहमी खास रक्तातच ह्याचे भिजणे

बदलत्या रुपाने रुजून कुजला धर्म
अंतरात शुचितेच्या लपले दुष्कर्म
... वेळीच करावे नष्ट निर्मिलेलेही
निर्मळ जगण्याचे हेच असावे मर्म


- निलेश पंडित
१ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा