हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

चाकमी जसा दिवसागणिक कमरेत थोडा वाकतो
जास्त मागे पाहतो जास्ती उसासे टाकतो

चेहर्‍यावर वाढल्या आहेत त्याच्या सुरकुत्या
पण तिला बघताच वेडा पांढरी बट झाकतो

सांग काहीही तुझ्यासाठी सहज त्यागेन मी
मी असे म्हणता म्हणाली "मी" जरासा टाक तो

दंग तो पळण्यात होता रोज काळाच्या पुढे
एकदाचा ये म्हणत त्याचीच करुणा भाकतो

आजही प्रत्येक अर्जुन जय मिळवतो शेवटी
चोख शत्रू मारतो धसताच त्याचे चाक तो

- निलेश पंडित
२० जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा