हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २ मार्च, २०१८

चर्चा


आकाशातच धारावीच्या दिशेस दृष्टी वळते
नको तेच शाश्वत असते हे पुन्हा नव्याने कळते

पाश्चात्त्यांच्या ज्ञानाचा थोडाच छडा लागावा
पुराणात ते आमच्याच मग आम्हाला आढळते

दीन कुपोषित जनता शिकते अभिमानाची भाषा
बधीर मेंदूंच्या तरुणांचे रक्त पुन्हा सळसळते

समाजातली प्रत्येकाची कर्तव्ये ठरलेली
कुणी सांगता कुणी मरावे कुणी सुरा पाजळते

श्रीमंतांच्या गुऱ्हाळात मध्यमवर्गाच्या चर्चा
कसे कुणाला खरे कळावे काय कुणाचे जळते

- निलेश पंडित
३ मार्च २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा