हा ब्लॉग शोधा

सोमवार, १२ मार्च, २०१८

भ्रमंती


तशीच

जशी खाचखळग्यांतून
मिळाल्याच तर खोलवर
वा वरवर
उमटलेल्या विरलेल्या उरलेल्या
तुरळक अर्धवट
पायखुणांमधून

जशी बाळगावी
छुपी वेदना
विरक्तीतही

वागवावी
ठसठसती अगम्य
न पटणारी भावना
तत्कालिन स्पष्ट तर्कामागे

जसा सावरत रहावं तोल
अंतरातल्या
पाशवी म्हणून नैसर्गिक
आणि आधुनिक म्हणून प्रागतिक
प्रवृत्तींच्या द्वंद्वातही

तशी सरपटते आहे
आकाशाकडे ठाम दृष्टी लावून
आजही
माझी कविता
गवसलेल्या शब्दांमधून
.... आणि त्याहूनही अधिक
हुकलेल्या



-  निलेश पंडित
१२ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा