हा ब्लॉग शोधा

रविवार, १ एप्रिल, २०१८

कसब

घालणारा वाद माझ्याशी पुरा फसतो
मात्र आताशा जरा मी एकटा असतो

प्रश्न का पडतो सुखी समृध्द दिसता मी
का असा आनंद आताशा तिला डसतो?

तालुका, जिल्हा व शहरे माणसांसाठी
देश मोठा माणसे मारून का वसतो?

उंच मजले बांधतो मी रोज प्रगतीचे
पण वयाचा क्षीण पाया सारखा धसतो

चार मोठी माणसे होती अधिक मोठी
आणि दारिद्र्यात बाकी वर्ग आक्रसतो

सद्गुणी माणूस रंगवणे कसब त्याचे
नेमका माणूस तो त्याच्यामधे नसतो

कैक वर्षे खूप तो रडला तिच्यासाठी
लावुनी शून्यात तो आता नजर हसतो


- निलेश पंडित
२ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा