हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

चौकट

भावना तुटक्या विखुरता मी कशा मांडून ठेवू
शब्द माझे चौकटीमध्ये कसे बांधून ठेवू

चल म्हणू नाहीच जमले वेगळे राहून जगणे
जाणवू दे हा तडा पण चल पुन्हा सांधून ठेवू

कुंपणे बांधून आपण फाटकेही लावली ना?
ठेवतो शेजार आपण मग भले भांडून ठेवू

धावतो हातातल्या आपण क्षणामागेच सारे
चल उद्याचे आज थोडेसे तरी रांधून ठेवू

रोज मर्यादेत जगणे हेच शिकलो फक्त आपण
देह सीमा एकदा येथील ओलांडून ठेवू


- निलेश पंडित
५ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा