हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

वारसे


अमृताच्या शुद्ध पाण्यातील द्रावातून अंगी गरळ हे भिनले कसे?
जाणिवांचा अस्त असता जवळ इच्छांना तरीही पंख का फुटले असे?

जाणिवा साऱ्याच नश्वर नेहमी असतात होत्या समजले होते मला
मात्र हे कळलेच नाही शेवटीही वासनेचे कायमी उरती वसे

अश्व जगण्याचा सदोदित दौडला बेफाम कायम द्रुतगतीने एकटा
पाहिल्याविण सरत गेले रम्य हिरवेगार सुंदर कैक परिसर छानसे

चंदनाची, देवदाराची टिकाऊ लाकडे कित्येक येथे पाहिली
वेळ, किंमत वेगळी पण शेवटी नशिबात सगळ्यांच्याच होणे कोळसे

कोण आहे व्हायचे अन् काय केले पाहिजे भवितव्य उत्तम व्हायला
ह्या विचारांची इथे संपून सद्दी मिरवतो आम्ही पुराणे वारसे


- निलेश पंडित
२५ आॅगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा