हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

प्रगती


येताना त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या
दोघांच्या मुद्रा शांत शहाण्या सुरत्या
... जाणून गाव घेण्याचा उत्कट भाव
पालथ्या घातल्या त्यांनी सगळ्या वस्त्या

सावकाश अभ्यासता शांत ते गाव
प्रगतीस आपल्या कळला त्यांना वाव
... पृथ्वीच्या दोन धृवांसम रुजले तेथे
मग बदलाचे मांडले कैक प्रस्ताव

माणसामाणसामधले फरक अनेक
हेरून पाडल्या फुटी रोज कित्येक
... वरवर असता ते एकदुजाचे शत्रू
सर्वत्र घडविला दु:खाचा अतिरेक

गावास दिले मग स्वप्न स्थैर्य शांतीचे
अन् मार्ग आखले आपल्याच प्रगतीचे


- निलेश पंडित
१ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा