हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

पात्र


संवेदनशील मुळातच होता आधी
जडली त्याला सामान्यत्वाची व्याधी
... दगडामातीवर लिहिल्या त्याने कविता
अनुभवली त्यांतच अद्वितीय समृद्धी

चलबिचल मनाची होता अस्थिर झाला
अनवट रागांचे सूर आळवित गेला
... लाभता अकल्पित स्थैर्याची अनुभूती
बांधून कोष बाहेर आत गुरफटला

जन्मणे जगावेगळे आगळे जगणे
तगमगणे आधी पण नंतर झगमगणे
... अस्वस्थतेत मोहरता प्रतिभा त्याची
उन्मळतानाही अवचित अथांग वसणे

हे कसे वाटते डाॅनसारखे पात्र?
नाटकात टाळ्या घेते हे सर्वत्र!


- निलेश पंडित
५ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा