हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

ससे


वसविण्याऐवजी कोंबली माणसे
गाव शहरास विस्तार म्हणतो कसे?

कासवाचा विजय स्फूर्तिदायक खरा
जिंकती मात्र बहुतेकवेळा ससे

फार पूर्वीच अंधार झाला इथे
आणि नुकतेच वर लोपले कवडसे

ही हिऱ्याची कथा गूढ, प्राचीनही
काढता रत्न उरतात ते कोळसे

वेगळे भेद पण भेद टळले कुठे?
नष्ट झाले कधी शोषणाचे वसे?

- निलेश पंडित
२९ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा