हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

शेर


दाद द्यावी आपली आपण जराशी आपल्याला
कोण मी केवळ कळावे आरशाला अन् मनाला

वाक्य हा साचाच केवळ अक्षरांनी घडवलेला
स्पर्श थोडासा तुझा होताच त्याचा शेर झाला

पाहतो दुसरीकडे मी पाहता माझ्याकडे तू
सांगते सावज कधी का थांगपत्ता पारध्याला

का तुझा विश्वास बसतो समजता माझी खुशाली
चेहरा हसराच दिसतो डंख असतो काळजाला

आजही ओळख न देता टाळते नजरानजर ती
मात्र जाणवते तिला सांभाळले कोणी कशाला

- निलेश पंडित
२९ मार्च २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा