हा ब्लॉग शोधा

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

भक्त


पाहिजे ते पाहिजे तेव्हा तिथे तो बोलतो
भक्त मी .. मी जो हवा तो अर्थ त्यातच शोधतो

नेत्रदीपक योजना असतात त्याच्या नेहमी
पण करे भलतेच वरती त्यात घाले घोळ तो

तो गरीबांच्या भुकेचे प्रश्न सोडवतो म्हणे
मात्र धनिकांचीच जगभर भोजने तो झोडतो

ठेवतो भयभीत लोकांना जरा तो नेहमी
लोक जखमी ठेवतो अन् मीठ वरती चोळतो

नेक अलिबाबा जगाला वाटला होता कधी
चाळिसांपैकीच ठरला एक लुच्चा चोर तो

शोषिताला शोषणाची माहिती असते कुठे!
वेल परजीवी विषारी वृक्ष नकळत पोसतो


- निलेश पंडित
९ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा