हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

झपाटा


अक्राळविक्राळ जग उभे आ वासून
खुणावित बोलावे समीप जेव्हा
रोजच भासते अपरिचित नवीन
अगम्य मोहक आकर्षक तेव्हा

जगताना ओतप्रोत समरसतेने
विरघळतो तो जणू प्रवाहात
अंतर्बाह्य जाणवते गती झपाट्याने
पुढे पुढे जातो नशेत कैफात

कुरतडलेला श्रमलेला थकलेला
देह झेपावत जातो उन्मादात
अवघड दऱ्याखोरी बिकट शिखरे
पराकाष्ठेने तो करी पादाक्रांत

आजतागायत उमजेना जाणवेना
धरेची तीच ती चक्राकार स्थिती
कापणे अंतर वेग, त्वरण, चालना
त्याच त्या दिशेला सारेच धावती


- निलेश पंडित
२७ आॅगस्ट २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा