हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

मातीमोल


वाटते अनमोल सारे
मात्र ठरते फोल सारे

रोज स्पर्धा जिंकण्याची
इच्छिती समतोल सारे

नवनव्या वाटा जगाच्या
मार्ग क्रमता गोल सारे

जीभ डोळे शब्द मोहक
गरळ मुरते खोल सारे

लुप्त मातीतील झाडे
आणि मातीमोल सारे

भूत ग्रासे वर्तमाना
वाजवा रे ढोल सारे


- निलेश पंडित
१ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा