हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

झोप


झोपणे माझेच होते जागणे माझेच आहे
वाटले मी चाललो पण आजही तेथेच आहे

नेहमी निवडून येतो तो प्रजेच्या बहुमताने
लोकही असतात त्याचे राज्यही त्याचेच आहे

एकशे पन्नास वर्षांचा जुना पाढा कशाला
आपल्याला आपल्यांनी फसवणे ताजेच आहे

नेहमी असतो उभा सर्वांपुढे तो मध्यभागी
पाहता चाली समजते तो खुजे प्यादेच आहे

सारखा झेपावलो अन् जातही गेलो पुढे मी
शेवटी कळले नकाशा राहिला मागेच आहे


- निलेश पंडित
२० आॅक्टोबर २०१९


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा