हा ब्लॉग शोधा

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

लगाव


देशाचा मातीचा  ।  जन्मल्याने राही
असा बंध काही  ।  नाही माझा

मेंदू ह्रदयात  ।  अनाद्यंत भाव
अतूट लगाव  ।  हाच पाया

देशात किरटी  ।  पोरे रडतात
अश्रू सुकतात  ।  गाली माझ्या

उंचावे मानव्य  ।  देश माझा जेव्हा
मान माझी तेव्हा  ।  उंचावते

देश दुबळ्यांच्या  ।  कधी कल्याणार्थ
जोडताच हात  ।  जोडतो मी

मनात मुरती ।  चवी रुची सूर
भरून ये ऊर  ।  तेव्हा माझा

देशाचे मातीचे  ।  मनात जन्मते
मनात रुजते  ।  बाळकडू


- निलेश पंडित
११ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा