हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

झरे


सारखे चेहर्‍यांसारखे चेहरे
हासणे लपविते आसवांचे झरे

हिंस्त्र पक्षी करे श्वापदाशी युती
पिटत टाळ्या उभी वासरे पाखरे

वाढते कर भरे अर्धपोटी प्रजा
सवलती घेत राजा भरे तोबरे

देह संन्यस्त पण मन रमे गोकुळी
ब्रह्मचर्यातही वासना पाझरे

लोक हरती इथे लोकशाहीमधे
मांडतो डाव त्याचे उखळ पांढरे

शांत निर्धास्त जो जो गुन्हेगार तो
न्यायमूर्ती जरा कावरेबावरे


- निलेश पंडित
१४ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा