हा ब्लॉग शोधा

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

सृष्टी


वैराण माळ कोणीच न अवतीभवती
पायाशी दगड नि फक्त कोरडी माती
... ती गर्द सावली माझी शक्य न आता
थोडेच प्रवासी क्वचितच केव्हा दिसती

दिसतात भग्न अवशेष जुन्या काळाचे
कोरडा जून पाचोळा पाया जाचे
... खोडात जीर्ण मोडकी व पोकळ घरटी
भवितव्य मोकळे आठवणींना बोचे

वाळवी ग्रासते फक्त त्वचेला थोडे
गळतात काटक्या खोड कुणी ना तोडे
... वाढली मुळे ती रुजत राहिली खोल
अर्धा मरतो अर्धा दामटतो घोडे

निष्पर्ण वृक्ष मी आहे एक खुशाली
बीजाने माझ्या सृष्टी हिरवी झाली


- निलेश पंडित
९ फेब्रुवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा