हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

कातडे


शुभ्र सुंदर फुलात
देठापाशी कीड दाटे
अवघेच स्पष्ट जग
असे मात्र उफराटे

वाममार्गी लावण्याची
माय करे उठाठेव
वर म्हणते लेकीला
म्हण मातृदेवोभव

जगण्यास कोट्यावधी
लोक देश वसविती
देशासाठी मरणे ही
कुणी म्हणे देशभक्ती

भावना व स्वप्न दोन्ही
कालवून होता नशा
विवेकास वळविण्या
मुक्त होती दाही दिशा

हिंस्त्र श्वापदे आजही
वावरती चोहीकडे
नव्या युगी पांघरती
नव्या शब्दांचे कातडे


- निलेश पंडित
१७ जुलै २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा