हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३० जुलै, २०१६

अंश

(डेनिस व्हिंसेंट ब्रूटस ह्या दक्षिण आफ्रिकन कवीच्या I must conjure from my past ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)


त्रस्त, बद्ध, अस्वस्थ कुणी ती
जाडजूडशा
साखळदंडांमधे नेहमी
खितपत दिसते
गतकालातिल
धूसर अंधुक
अस्वीकृतशा
पिशाच्चरूपातही शांत ती
मनास सलते
अविरत संतत
धडपड करते
स्वातंत्र्याचा
हक्क स्वतःचा
फक्त मागते

मला वाटते
कधीतरी मी
कसेतरी .... की म्हणू .... कसेही
पाचारावे
तिला एकदा
अन् सांगावे
तुझ्याच रक्तामांसाचा मी
अंश एक हे
मला जाणवे


स्वप्नावस्था?
तुम्हां वाटते
मनास माझ्या
मी रंजवतो?


त्वेष, बंड रक्तात तिच्या अन्
तसेच जर ते
माझ्याही तर -
तिच्या नि माझ्या
रक्ता-मांसा-मज्जेमध्ये
वंशामध्ये
मला कसे भासावे अंतर?


- निलेश पंडित
३१ जुलै २०१६

____________________

मूळ कविता:

I must conjure from my past

I must conjure from my past
the dim and unavowed
spectre of a slave,
of a bound woman,
whose bound figure
pleads silently
and whose blood I must acknowledge in my own

faniciful wraith? Imagining?
Yet how else can I reconcile my rebel blood and protest
but by acknowledgement
of that spectre's mute rebellious blood


- Dennis Vincent Brutus

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा