हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

फरक


अचानक स्फोटांविना
सावकाश वाढणारा दाह
छोट्याशा
हळूहळू वाढणाऱ्या संख्येत
सुरुवातीला न जाणवणाऱ्या
ठिणग्या
जळण्याआधी धुमसणारा
विचित्र अग्नी ....

असे माफक छोटे छोटे
फरक वगळता
नेमका तसाच असतो

ज्ञान अज्ञान
स्वप्न सत्य
श्रीमंती गरीबी
नवं जुनं
समृद्धी वंचना
शोषक शोषित

ह्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या
संतत घर्षणातून
वर्षानुवर्षे
जळणारा
भीषण वणवा

ज्याचं खरं वेगळेपण वसतं
फक्त एका
अक्राळविक्राळ फरकात

.... तो कधीही
विझत - संपत - शमत नाही


- निलेश पंडित
६ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा