हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

कावळे

रोज मेंदू जरा गोंधळे
नेहमी वेगळे सापळे

हासरासा नवा चेहरा
अंतरी पण जुनी वादळे

साखरेचाच ठेवा जिथे
जीवघेणे तिथे मुंगळे

देत दिक्षा गळे कापती
तंत्र आता असे आगळे

मोर मागे बिचारा लुळा
नाचती अन् पुढे कावळे

शंख फुंकून जाती जुने
मरण कवटाळती कोवळे

- निलेश पंडित
२२ आॅक्टोबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा