हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

जाण

 

लपतात शब्दांमागे

शब्द कित्येक अव्यक्त

मूकपणे रुजतात

मज एरवी अज्ञात


राग भिनतो अंतरी

सूर लागतात जेव्हा

अपरिचित होतात

सर्व वर्ज्य सूर तेव्हा


गळी नसतो नशिबी

काही स्वरांचा गोडवा

काही रागांचा आस्वाद

कानापुरता असावा


पडतात तशा काही

सुटतात तुटतात

गाठी अगम्य असंख्य

विरतात उरतात


नसे त्याचे कुतूहल

असे असण्याचा प्राण

असे नसे ह्यात नसे

माझी अस्तित्वाची जाण



- निलेश पंडित

२० फेब्रुवारी २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा