हा ब्लॉग शोधा

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

अनन्य

 

अनन्यतेचा वेध घेत ती सारी वर्षे जगली

दुर्मुखली गहिवरली रडली क्वचित कधी तळमळली

... खळखळून हसली ... पण त्याला आनंदी बघताना

तिने तिचे क्षण संपवले अन् अवचित हळूच विरली


ती मायाळू तिच्या न त्याला कळल्या अवघड आशा

तो करडा रांगडा जरासा त्यात उराशी ईर्ष्या

... शब्दांचा वापर विरळा मौनाचे अद्भुत स्थान

एकदुजाच्या सहवासाची अगम्यशी परिभाषा 


न बोलता समजून असावे हीच आगळी बोली

कधी वाटले पटली ओळख कधी न वाटे पटली

... मुळात पटण्याचीच कधी भासली न आवश्यकता

तिच्या स्मृतीतच त्याचीही उरलेली वर्षे सरली


'ती'त्वाचा अतिरेक तिचा तर 'मी'त्वाचा तो त्याचा

विचार संवादा पलिकडचा आनंदाचा साचा



- निलेश पंडित

२३ आॅगस्ट २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा