हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २९ जून, २०२१

दूर

 

मी जगापासून रोजच दूर केवळ जात गेलो

हे बरे मी खोलवर माझ्या मनाच्या आत गेलो


वाटले स्वातंत्र्य म्हणजे घेतली आम्ही भरारी

आज फसगत समजते केवळ जुन्या पाशात गेलो


शाश्वती त्यांनी दिली मोठ्या मनाची बोलताना

चूक झाली फक्त माझी मी जरा खोलात गेलो

 

सहज माती विसरलो झालो तिच्यापासून परके

मारतो आता बढाया उंच आकाशात गेलो


आधुनिक विज्ञान साधावे कसे आम्ही व केव्हा

नेहमी मिळताच संधी फक्त इतिहासात गेलो


उघडली नाहीत दारे जी मला होती हवी ती

शेवटी मी उघडणाऱ्यांच्या खुल्या विश्वात गेलो



- निलेश पंडित

३० जून २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा