हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

जमाखर्च

(श्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या "क्या खोया, क्या पाया जग में" ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)

जमाखर्च सुखदुःखाचा मी मांडत नाही
रुजू न देतो खेद खंत मी मनात काही
…. मनोमीलनासवेच येतो वियोग जेव्हा
स्वीकृत असते तनामनाची अखंड लाही
आठवणी हृदयात नेहमी
आनंदाने चाचपतो मी

पृथ्वीचा अव्याहत अगणित अनंत फेरा
जीवनसृष्टी संतत अविरत अथांग धारा
…. शून्यमात्र यत्किंचित केवळ त्यांत एक मी
इवली चोच नि क्षणिकच इवला तिजला चारा
मृत्यूचे येता आमंत्रण
त्यागावे मी माझे मीपण

जन्म नि मृत्यू अखंड येथे चक्र चालते
पांथिक सारे … कुणास कोठे स्थैर्य लाभते?
…. आज इथे तर उद्या तिथे ही ललाटरेषा
उषेमागुती निशा आपले पंख पसरते
गूढ तमी अंतरात वळतो
अंतर्मुख मी मलाच कळतो



- निलेश पंडित
११ एप्रिल २०१५
__________________________

मूळ कविता:

क्या खोया क्या पाया

क्या खोया, 
क्या पाया जग में
मिलते और बिछुड़ते मग में
मुझे किसी से नहीं शिकायत
यद्यपि छला 
गया पग-पग में
एक दृष्टि बीती पर डालें, 
यादों की पोटली टटोलें!

पृथ्वी लाखों वर्ष पुरानी
जीवन एक अनन्त कहानी
पर तन की अपनी सीमाएँ
यद्यपि सौ 
शरदों की वाणी
इतना काफ़ी है अंतिम 
दस्तक पर, खुद दरवाज़ा खोलें!

जन्म-मरण अविरत फेरा
जीवन बंजारों का डेरा
आज यहाँ, कल कहाँ कूच है
कौन जानता 
किधर सवेरा
अंधियारा आकाश असीमित,
प्राणों के पंखों को तौलें!
अपने ही मन से कुछ बोलें!


- अटलबिहारी वाजपेयी
८ दिसंबर २००१

1 टिप्पणी:

  1. अर्थपूर्ण , मनात खोल पोचणाऱ्या मूळ हिंदी कवितेचा अनुवाद हि तितकाच किंबहुना आपली माय मराठीत असल्यामुळे आणखीन मनाच्या गाभ्यात पोचला.

    उत्तर द्याहटवा