हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

शिंपण


जून त्वचे सारख्याच आता सुरकुत्या इथे
जिथे निरांजन समया होत्या चिता जळते तिथे
टाळ चिपळ्या मृदंगांनी सजलेला जयघोष
विरत विरत उरला आता अमर्याद आक्रोश
सूर्यप्रकाशात फुलत काल आज करपले उन्हात
तथाकथित अमृतवाणी थिजली फक्त मनात
विशेष काही झालं नाही आला गेला काळ
नकळत उच्च संस्कृतीची झाली जरा आबाळ
जिज्ञासेच्या पिकाच्या जागी अभिमानाचे तण
काल गळला घाम आज रक्ताची शिंपण


- निलेश पंडित
५ फेब्रुवारी २०१६

२ टिप्पण्या: