हा ब्लॉग शोधा

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

घालमेल

 

देह जगण्याचे ओझे

स्वप्ने त्यावर भरीस

चढउतारात होतो

जीव मात्र कासावीस


सुप्त आपले आपण

मन राहते जगत

अल्प वाढते बाहेर

थके आत भोवर्‍यात 


क्षणोक्षणी जी ती वेळ

वाटे कल्पांताचा क्षण

जरी नगण्य आपले 

जन्म तसेच मरण


अनभिज्ञता ग्रासता

मीपणाची रेलचेल

नग्न जाणीव जन्मता

उरे फक्त घालमेल


- निलेश पंडित

१९ फेब्रुवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा